SSC Exam Result : शिक्षण अपूर्ण राहिल्याची खंत, जिद्दीनं पूर्ण केलं वयाच्या ६० व्या वर्षी दहावीचं शिक्षण
VIDEO | पुण्यात 60 व्या वर्षी शितल अमराळे 10 वीची परीक्षा उत्तीर्ण, किती टक्के मिळाले?
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांने घेतलेल्या इयत्ता दहावीचा निकाल काल जाहीर झाला आहे. यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारली असल्याचे पाहायला मिळाले तर राज्यातील इयत्ता दहावीचा निकाल 93.83 टक्के लागला आहे. दरम्यान, पुण्यातील शीतल अमराळे या महिलेने वयाच्या 60 वर्षी जिद्दीने 10 वीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केले आहे. शीतल अमराळे यांना त्यांच्या परिस्थितीमुळे शिक्षण अर्धवट सोडावं लागलं होतं. वयाच्या 60 व्या वर्षी 10 वीची परीक्षा देत पन्नास टक्के गुण मिळवत शीतल अमराळे परीक्षा उत्तीर्ण झाल्या आहेत. शिक्षण अपूर्ण राहिल्याची खंत शीतल अमराळे यांच्या मनात होती, त्यामुळं 27 वर्ष मेहनत करत यशस्वी उद्योजिका म्हणून नावारूपाला आल्यानंतर त्यांनी 60 व्या वर्षी इयत्ता 10 वी परीक्षा दिली. शीतल अमराळे यांच सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.