मतदारसंघातील प्रश्न प्रलंबित, राष्ट्रवादीचे आमदार आक्रमक; महापालिकेसमोर उपोषण करणार
मतदारसंघातील प्रलंबित कामांसाठी राष्ट्रवादीच्या आमदाराने उपोषणाचे हत्यार उपसले आहे. पुण्यातील वडगाव शेरीचे आमदार सुनील टिंगरे परवापासून महापालिकेसमोर उपोषणाला बसणार आहेत.
पुणे : पुण्यातील वडगाव शेरीचे आमदार सुनील टिंगरे परवापासून महापालिकेसमोर उपोषणाला बसणार आहेत. मतदारसंघातील वाहतूक कोंडी, पाणी प्रश्नांसंदर्भात ते उपोषण करणार आहेत. सातत्याने बैठका, प्रत्यक्ष भेट आणि पत्रव्यवहाराच्या माध्यमातून पाठपुरावा करूनही प्रशासन मागण्यांकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे उपोषण करण्याचा निर्णय सुनील टिंगरे यांनी घेतला आहे. मला जाणीवपूर्वक त्रास देण्याचं काम केलं जात आहे. वारंवार पाठपुरावा करूनही माझ्या मतदारसंघातील कामांकडे दुर्लक्ष केलं जातं आहे. सरकारवर मी बोलणार नाही, मात्र प्रशासन माझ्या मतदारसंघातील वाहतूक कोंडी, पाणी प्रश्न मार्गी लावले जात नाहीत. त्यामुळे प्रशासनाच्या विरोधात 6 तारखेपासून मी महापालिकेसमोर उपोषणाला बसणार आहे. लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही, असं सुनील टिंगरे म्हणाले आहेत.
Published on: Apr 04, 2023 03:05 PM
Latest Videos