शरद पवारांच्या वक्तव्याचा अर्थ काय? 2024 ला मविआ वेगळं लढणार? पाहा संजय आवटे यांचं विश्लेषण
Sharad Pawar Statement About Mahavikas Aghadi : शरद पवार यांच्या वक्तव्याचा राजकीय अर्थ काय? वरिष्ठ पत्रकार संजय आवटे यांचं विश्लेषण. पाहा संपूर्ण व्हीडिओ...
पुणे : शरद पवार यांनी महाविकास आघाडी आणि 2024 च्या निवडणुकीबाबत महत्वाचं वक्तव्य केलंय. त्यानंतर आता महाविकास आघाडी येत्या निवडणुकीत एकत्र लढणार की वेगवेगळं याबाबत चर्चांना उधाण आलंय. यावर वरिष्ठ पत्रकार संजय आवटे यांनी विश्लेषण केलंय. “शरद पवारांचे हे विधान काही धक्कादायक नाही. शरद पवारांनी असं स्टेटमेंट अनेक वेळा केलेले आहेत. शरद पवार यांच्या विधानाने कुठल्याही टोकाला जायची गरज नाही. महाविकास आघाडी सरकारची स्थापना होताना देखील अशी विधाने त्यांनी दहा वेळा केलेली आहेत, असं संजय आवटे म्हणाले आहेत. बंगाल केरळ नागालँड या सगळ्या विधानसभा निवडणुकांमध्ये शरद पवारांनी घेतलेली भुमिका काँग्रेसच्या विरोधातली आहे. गुजरातमध्ये भाजपसाठी काँग्रेसच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवार दिले होते. कर्नाटकमध्ये सुद्धा आत्ता तेच होत आहेत. शरद पवारांची स्वतःची एक भूमिका आहे पण ते काँग्रेस आणि UPA सोबत असतीलच, असं नाही. महाविकास आघाडी सरकार शरद पवार यांच्यामुळे स्थापन झालं. त्यामध्ये त्यांचा वाटा मोठा आहे. दिल्लीत झालेल्या बैठकीला देखील शरद पवार नव्हते. त्यामुळे शरद पवारांची विधान संधीग्न आहे, असं संजय आवटे म्हणाले आहेत.