मी 'या' राजकारणाकडे बघतच नाहीत; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?

मी ‘या’ राजकारणाकडे बघतच नाहीत; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?

| Updated on: Apr 13, 2023 | 8:17 AM

Supriya Sule on Maharashtra Politics : सध्याच्या राजकारणावर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया; म्हणाल्या...

पुणे : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सध्याच्या राजकारणावर भाष्य केलंय. बाबरी मशीद पाडण्याचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलाय. त्याबाबत विचारलं असता, “सुप्रिया सुळे या राजकारणाकडे बघतच नाहीत. कारण मला गलिच्छ राजकारण आवडत नाही. यासाठी मी राजकारणात आलेच नाहीये. लोकांची सेवा करण्यासाठी आणि चांगले, लोकहिताचे निर्णय घेण्यासाठी मी राजकारणात आलीये, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. माझी संसदेतील भाषणं काढा, माझी विधानं बघा, मी कायम लोकांच्या हितासाठी बोलत असते. तेच मी माझं कर्तव्य मानते”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. त्या पुण्यात माध्यमांशी बोलत होत्या.

Published on: Apr 13, 2023 08:17 AM