माणुसकीला न शोभणारी ही घटना, पक्षीय राजकारणातील गलिच्छ स्तर; सुषमा अंधारे संतप्त

माणुसकीला न शोभणारी ही घटना, पक्षीय राजकारणातील गलिच्छ स्तर; सुषमा अंधारे संतप्त

| Updated on: Apr 04, 2023 | 1:52 PM

Sushma Andhare on Thane incident : ठाकरेगटाच्या गर्भवती महिला कार्यकर्त्यीला मारहाण झाली आहे. त्यावर सुषमा अंधारे म्हणतात...

पुणे : ठाकरेगटाच्या गर्भवती महिला कार्यकर्त्यीला मारहाण झाली आहे. ठाण्यात हा सगळा प्रकार घडलाय. त्यावर सुषमा अंधारे यांनी आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. अशा प्रकारे मारहाण करणं हे माणुसकीला न शोभणारं आहे. पक्षीय राजकारणातील गलिच्छ स्तर आता पाहायला मिळतोय. हे योग्य नाही. आपण किमान माणुसकी धर्मतरी पाळला पाहिजे. याआधी कुणावर टीका झाली नाही का? याआधीही टीका झाली पण तेव्हा एवढ्या खालच्या पातळीला कुणी जात नव्हतं, असं सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत. त्या पुण्यात बोलत होत्या.

Published on: Apr 04, 2023 01:38 PM