एकीकडे पारा 40 पार, तर दुसरीकडे पावसाचा अंदाज; पुण्यात संमिश्र वातावरण

एकीकडे पारा 40 पार, तर दुसरीकडे पावसाचा अंदाज; पुण्यात संमिश्र वातावरण

| Updated on: Apr 15, 2023 | 10:41 AM

Pune Unseasonal Rain Update News : पुणे शहरासह उपनगरांमध्ये तीन दिवस पावसाचा अंदाज; पाहा व्हीडिओ...

पुणे : पुणे शहरासह उपनगरांमध्ये तीन दिवस पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पुणे शहरात दिवसभर ऊन तर संध्याकाळच्या सुमारास ढगाळ वातावरण असणार असल्याचा अंदाज वर्तण्यात आला आहे. तर पुढचे दोन दिवस पुणे शहराला हवामान खात्याने येलो अलर्ट दिला आहे. आज आणि उद्या शहरात जोरदार पावसाचा हवामान खात्याचा अंदाज आहे. त्यासोबतच उष्णतेचा पारा देखील वाढणार आहे. तापमान ४० अंश डिग्री सेल्सिअस पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. पुणे वेधशाळेने हा अंदाज वर्तवला आहे. दुपारच्या सुमारास पुणे शहरात तापमानाचा पारा वाढणार आहे. पुणेकरांनी काळजी घेण्याचं आवाहन हवामान खात्याकडून करण्यात आलं आहे.

Published on: Apr 15, 2023 10:09 AM