Pune Protest : युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड; कार्यकर्ते आक्रमक
Pune Youth Congress Protest : सरकारकडून नोकरभरती होत नसल्याने बेरोजगारी वाढली आहे. या विरोधात आज पुण्यात युवक कॉंग्रेसने मोर्चा काढला होता. यावेळी पोलिसांनी आंदोलकांची धरपकड केल्याने गोंधळ उडाला.
पुण्यात युवक कॉंग्रेसकडून काढण्यात आलेल्या मोर्चावर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. यावेळी आंदोलन आणि पोलिसांत धरपकड झालेली बघायला मिळाली आहे. MPSC मुलांची परीक्षा होत आहे. मात्र निकाल वेळेत लावत नाहीत. नोकऱ्या देत नाहीत. मनमानी कारभार हे सरकार करत आहे, असा आरोप युवक काँग्रेसने केला. बेरोजगारी विरोधात युवक काँग्रेसने पुण्यात मोर्चाचे आयोजन केले होते. त्यासाठी पुण्यातून मुंबईकडे हा मोर्चा निघाला होता. मात्र अचानक या मोर्चाला परवानगी नाकारण्यात आल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. यावेळी पोलिसांनी आंदोलक कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी सुरू करत आक्रमक पवित्रा घेतल्याचं बघायला मिळालं. शेवटी पोलीसांनी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.

नाशिकमध्ये रिक्षा चालकाची गुंडागिरी; व्हिडिओ व्हायरल

ऐवढा मोठा तो नाही, जेवढा दाखवला गेला..; खोक्याबद्दल धसांच मोठं विधान

सुरेश धस खोक्याच्या घरी पोहोचले, कुटुंबाने सांगितली आपबिती

'राऊतांच्या मेंदूचे दोन तुकडे झालेत अन्...', भाजप नेत्याची टीका
