Ram Nath Kovind यांच्या दौऱ्याआधी जिल्हा प्रशासनाकडून तायारीचा आढावा

Ram Nath Kovind यांच्या दौऱ्याआधी जिल्हा प्रशासनाकडून तायारीचा आढावा

| Updated on: May 25, 2022 | 9:42 AM

यंदाच्या लक्ष्मीबाई स्मृती पुरस्कार 2022 वितरण राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते होणार आहे. शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष शुभारंभ सोहळ्याला महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार आणि राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती आहे.

पुणे : राष्ट्रपती रामनाथ कोविंद (president ramnath kovind) गुरुवारी पुणे (Pune) दौऱ्यावर येत आहेत. राष्ट्रपतींच्या दौऱ्याआधी जिल्हा प्रशासनाकडून तयारीचा आढावा घेतला जातोय. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख (Pune Collector) यांनी सर्व विभागांची बैठक घेतली आहे. गुरुवारी राष्ट्रपतींचा मुक्काम पुण्यात असणार आहे. शुक्रवारी बालगंधर्व रंगमदिरात दगडूशेठ हलवाई गणती मंडळाच्या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. गुरुवारी संध्याकाळी 7 वाजून10 मिनीटांनी राष्ट्रपतींचं विमानतळावर आगमन होणार आहे. पुण्यातील बुधवार पेठेतील लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षाचा शुभारंभ सोहळा शुक्रवारी म्हणजेच 27 मे रोजी दुपारी 12 वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याला राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रपती कोविंद यांच्यासह माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील या देखील या सोहळ्याला उपस्थित राहतील, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रताप परदेशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

 

Published on: May 25, 2022 09:33 AM