CCTV : आधी फिल्मी स्टाईल एंट्री, नंतर कोयत्याचा धाक दाखवत चोरी, पुण्यातील हुक्का गँग गजाआड
वाईन शॉपमध्ये कोयत्याचा धाक दाखवून लुटणाऱ्या हुक्का गँगला पोलिसांनी अटक केली आहे. (Pune Robbery in wine shop)
पुणे : वाईन शॉपमध्ये कोयत्याचा धाक दाखवून लुटणाऱ्या हुक्का गँगला पोलिसांनी अटक केली आहे. पुण्यातील सहकार नगर परिसरात ही घटना घडली आहे. ही सर्व घटना दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. (Pune Robbery in wine shop)
पुण्यातील सहकार नगर परिसरात एक वाईन शॉप आहे. या वाईन शॉपमध्ये बुधवारी 3 मार्चला सहा जण आत घुसले. या सर्वांनी स्वेटर आणि मास्क घातले होते. त्यानंतर ते दुकानात शिरले. त्यांनी दुकान मालकाला मारहाण करण्यास सुरुवात केली. यानंतर त्यातील एका चोराने त्या मालकावर कोयता उगारत दुकानातील पैशांवर डल्ला मारला.
दरम्यान ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. या सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. तर अद्याप यातील चार जण फरार आहेत. याच टोळीने 8 दिवसांपूर्वी बिबवेवडी परिसरात वृत्तपत्र विक्रेत्याला अशाचप्रकारे लुटलं होतं. (Pune Robbery in wine shop)

बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट

वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच

जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले

धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम
