इंदुरीकर महाराज कीर्तनातून सामान्य माणसावर संस्कार करतात- शरद पवार
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या कीर्तनाचं कौतुक केलंय. पुण्यातील एका कार्यक्रमात त्यांनी इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनातील महत्वाचे मुद्दे अधोरेखित केले आहेत. पाहा,,,
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांच्या कीर्तनाचं कौतुक केलंय. पुण्यातील एका कार्यक्रमात त्यांनी इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनातील महत्वाचे मुद्दे अधोरेखित केले आहेत. मी इंदुरीकर महाराजांचं कीर्तन बघत असतो. मला आजही त्यांची कीर्तन ऐकायची इच्छा होती. मात्र लवकर निघायचं असल्याने मला त्यांना ऐकता येणार नाही. पण पुन्हा कधीतकी मी त्यांचं कीर्तन ऐकणार आहे, असा शब्द मी त्यांना देतो, असं पवार म्हणाले. इंदुरीकरांच्या कीर्तनामध्ये गमती असतात. त्यांची दिशा काय असते आता सगळच काही सांगणार नाही. पण त्यांच्या कीर्तनात एक सहजता आहे. सामान्य माणसावर कीर्तनातून चांगले संस्कार ते करत असतात, असंही शरद पवार म्हणालेत.
Published on: Feb 06, 2023 08:39 AM
Latest Videos