कसबा पोटनिवडणुकीची जबाबदारी शिंदे गटाच्या ‘या’ दोन नेत्यांवर; रणनिती काय? पाहा…
कसबा विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदेगटाची महत्वपूर्ण बैठक होणार आहे. यात निवडणुकीसंदर्भातली रणनिती ठरवली जाणार आहे.
पुणे : कसबा विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदेगटाची महत्वपूर्ण बैठक होणार आहे. भरत गोगावले आणि नरेश म्हस्के कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी शिंदे गटाकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. या निवडणुकीची सर्व जबाबदारी भरत गोगावले आणि नरेश म्हस्के यांच्यावर सोपवण्यात आली आहे. त्याच अनुषंगाने शिंदेगटाचे हे दोन्ही नेते आज पुण्यात बैठका घेणार आहेत. आज दुपारी बाळासाहेबांची शिवसेना भवनमध्ये ही बैठक पार पडणार आहे. यात निवडणुकीची रणनिती ठरवण्यात येणार आहे.
Published on: Feb 13, 2023 09:23 AM
Latest Videos