दीड महिन्यांपासून 88 हजार एसटी कर्मचाऱ्यांचं वेतन रखडलं; कोर्टाच्या आदेशानंतरही वेतन नाहीच!

दीड महिन्यांपासून 88 हजार एसटी कर्मचाऱ्यांचं वेतन रखडलं; कोर्टाच्या आदेशानंतरही वेतन नाहीच!

| Updated on: Feb 15, 2023 | 10:52 AM

दीड महिन्यांपासून 88 हजार एसटी कर्मचाऱ्यांचं वेतन रखडलं आहे. कोर्टाच्या आदेशानंतर आता 15 तारीख उलटली तरीही या एसटी कर्मचाऱ्यांचं वेतन झालेलं नाही. पाहा व्हीडिओ...

पुणे : एसटी कर्मचाऱ्यांचं वेतन रखडलं आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे. दीड महिन्यांपासून 88 हजार एसटी कर्मचाऱ्यांचं वेतन रखडलं आहे. कोर्टाच्या आदेशानंतर आता 15 तारीख उलटली तरीही या एसटी कर्मचाऱ्यांचं वेतन झालेलं नाही. फेब्रुवारी महिना आला तरी जानेवारीचं वेतन माञ थकीत आहे. कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी सरकारकडून 360 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलीये. तरीही हजारो कर्मचाऱ्यांचं वेतन झालेलं नाही. गेल्या सहा महिन्यांपासून कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर होत नाहीयेत. “सरकारने यामध्ये राजकारण आणू नये. आम्हाला फक्त शब्द दिला जातो की वेतन वेळेवर मिळेल पण तो थकवला जातो. आम्हाला न्याय द्या. आमचं वेतन वेळेवर करा”, अशी मागणी हे एसटी कर्मचारी करत आहेत.

Published on: Feb 15, 2023 10:52 AM