परीक्षा विभागाच्या कारभाराविरोधात तीव्र निदर्शनं! सावित्रीबाई फुले विद्यापीठात ABVP आक्रमक
Pune Student Protest : चुकीच्या पद्धतीने निकाल लावल्याचा आरोप करत यावेळी अभाविपच्या कार्यकर्त्यांनी आंदोनल केलं. यावेळी विद्यापीठाच्या मुख्य इमारतीच्या बाहेर रुग्णवाहिका आणली. परीक्षा विभागावर उपचार करण्याची गरज आहे, असा टोला आंदोलकांनी लगावलाय.
पुणे : पुण्यात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं (ABVP Pune) आंदोलन केलंय. सावित्रीबाई फुले विद्यापीठ परिसरात आक्रमक निदर्शनं यावेळी करण्यात आली. परीक्षा विभागाच्या कारभाराविरोधात विद्यार्थ्यांनी (Students Protest) जोरदार घोषणाबाजी केली. पुणे विद्यापीठात अभाविपच्या वतीने ‘रुग्णवाहिका प्रतिकात्मक’ आंदोलन यावेळी करण्यात आलं. चुकीच्या पद्धतीने निकाल लावल्याचा आरोप करत अभाविपच्या कार्यकर्त्यांनी आंदोनल केलं. विद्यापीठाच्या (Pune University) मुख्य इमारतीच्या बाहेर रुग्णवाहिका आंदोलकांनी आणली. या रुग्णवाहिकेच्या माध्यमातून परीक्षा विभागावर उपचार करण्याची गरज आहे, असं म्हणत प्रतिकात्मक टीका करण्यात आली. परीक्षांचे निकाल लावताना घोळ केला जात असल्याचा आरोप आंदोलकांकडून करण्यात आला. विद्यार्थ्यांनी यावेळी घोषणा देत ठिय्या आंदोलन केलं. प्रभारी आणि कुलगुरु यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करुनही कोणतीही ठोस पावलं उचलली जात नसल्यानं विद्यार्थी आक्रमक झाले होते.