Pune Crime News : आरोपी गौरव अहुजाचा येरवडामध्ये मुक्काम वाढला
Pune Yerwada Crime : पुण्यातील अश्लील चाळे प्रकरणी आरोपी गौरव अहुजा याला आणखी काही दिवस येरवडा जेलमध्ये राहावं लागणार आहे. आज गौरवच्या जमीन अर्जावर न्यायालयात सुनावणी होती.
पुण्यातील अश्लील चाळे प्रकरणी आरोपी गौरव अहुजा याचा येरवडा जेलमधील मुक्काम आता वाढलेला आहे. 20 मार्च पर्यंत गौरव अहुजाचा जेलमध्ये मुक्काम असणार आहे. अहुजाच्या जमीन अर्जावर आज सुनावणी झाली. गौरवचा मित्र भाग्येश ओसवाल याला आज जमीन मिळण्याची शक्यता आहे. पुण्यात येरवडा चौकात मद्यपान करून अश्लील चाळे करण्याचा एक व्हिडिओ काल व्हायरल झाला होता. यात पोलिसांनी गौरव अहुजा आणि त्याचा मित्र भाग्येश ओसवाल यांना ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर या दोघांची रवानगी येरवडा जेलमध्ये करण्यात आली होती. आज गौरवच्या जामिनावर सुनावणी झाली. यात त्याचा मुक्काम 20 तारखेपर्यंत येरवडा जेलमध्ये वाढवण्यात आलेला आहे.
Published on: Mar 17, 2025 06:46 PM