मनपाने बॅनर हटवल्यामुळे औरंबादमध्ये शिवप्रेमींमध्ये राडा, शिवप्रेमी संतप्त

| Updated on: Feb 17, 2022 | 10:47 AM

काल रात्री शहरातले काही शिवप्रेमींचे बॅनर (banner) महापालिकेने हटवल्याने शहरात रात्री काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. औरंगाबाद (aurangabad) शहरातल्या क्रांती चौकात बॅनर लावण्यात आले होते. महापालिकेने रात्री उशिरा बॅनर काढल्याने घटनास्थळी अनेक कार्यकर्ते उपस्थित झाले होते.

काल रात्री शहरातले काही शिवप्रेमींचे बॅनर (banner) महापालिकेने हटवल्याने शहरात रात्री काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. औरंगाबाद (aurangabad) शहरातल्या क्रांती चौकात बॅनर लावण्यात आले होते. महापालिकेने रात्री उशिरा बॅनर काढल्याने घटनास्थळी अनेक कार्यकर्ते उपस्थित झाले होते. गोंधल होण्याची स्थिती निर्माण झाली होती. परंतु पोलिसांना (police) या प्रकरणाची भणक लागताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि कार्यकर्त्यांना तिथून पांगवले आहे. घटनास्थळी रात्री अनेक पोलिस उपस्थित होते. तसेच रात्री तिथं बंदोबस्त देखील ठेवण्यात आला होता. सध्या औरंगाबादच्या महापालिकेत शिवसेनेची (shivsena) सत्ता आहे. त्यामुळे त्यांनी मुद्दाम खोडसाळपणा केला असल्याचा आरोप बॅनर कार्यकर्त्यांचा आहे. पोलिसांनी वेळीच मध्यस्थी केल्यानं वातावरण निवळल्याचं आम्हाला समजतंय. शिवजयंती तोंडावर आल्याने महाराष्ट्रात अनेक ठिकाणी शिवजयंती बॅनर लावण्यात येतात. पण महापालिकेने कारवाई केल्याने तिथं चांगलाचं गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले.

Chhagan Bhujbalयांच्या Santacruz मधील प्रॉपर्टीची पाहणी केल्या प्रकरणी Kirit Somaiyaवर गुन्हा दाखल
चंद्रकांतदादा सोमय्यांच्या प्रकरणात पडू नका, नाही तर तुमचेही कपडे फाटतील; राऊतांचा सल्ला