“देवेंद्र फडणवीस जे बोलले त्यात तथ्य”, पहाटेच्या शपथविधीवरून राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रतिक्रिया
पहाटेच्या शपथविधीवेळी शरद पवार यांनीच पुढाकार घेतला होता. पण नंतर त्यांनी ऐनवेळी माघार घेत डबलगेम केला, असं फडणवीस म्हणाले होते.याच पार्श्वभूमीवर महसूल मंत्री आणि भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पंढरपूर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रिपब्लिकन भारत या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राष्ट्रवादी आणि भाजपचं सरकार राज्यात स्थापन करण्यासाठी शरद पवार यांचा काय रोल होता यावर भाष्य केलं. पहाटेच्या शपथविधीवेळी शरद पवार यांनीच पुढाकार घेतला होता. पण नंतर त्यांनी ऐनवेळी माघार घेत डबलगेम केला, असं फडणवीस म्हणाले होते. त्यावर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत आपण टाकलेल्या गुगलीवर देवेंद्र फडणवीस यांची विकेट पडली, असं म्हणाले. याच पार्श्वभूमीवर महसूल मंत्री आणि भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “देवेंद्र फडवणीस जे बोलत आहेत त्यात तथ्य आहे. कुणीही कितीही इन्कार केला, तरी सत्य नाकारता येणार नाही,” असं विखे पाटील म्हणाले.
Published on: Jun 30, 2023 11:40 AM
Latest Videos