संजय राऊत यांच्या आरोपांनंतर राधाकृष्ण विखे पाटील यांचं स्पष्टीकरण; म्हणाले, होय झाकीर नाईकने...

संजय राऊत यांच्या आरोपांनंतर राधाकृष्ण विखे पाटील यांचं स्पष्टीकरण; म्हणाले, “होय झाकीर नाईकने…”

| Updated on: Jun 23, 2023 | 10:34 AM

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संस्थेला झाकीर नाईकने साडेचार कोटी रुपये दिले, असा आरोप केला आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. संजय राऊत यांच्या या दाव्यावर राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

पुणे : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संस्थेला झाकीर नाईकने साडेचार कोटी रुपये दिले, असा आरोप केला आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. संजय राऊत यांच्या या दाव्यावर राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. झाकीर नाईकने संस्थेला अडीच कोटी रुपये दिले होते, अशी कबुली विखे पाटलांनी दिली. ते म्हणाले की, “संजय राऊत यांच्या डोक्यावर परिणाम झालाय, असं मी अनेकदा सांगितलंय. तुम्ही सुद्धा पत्रकार बांधवांनी त्यांच्यापासून सावध राहिलं पाहिजे. हा मुद्दा महत्त्वाचा आहे. झाकीर नाईकचा जो मुद्दा आहे, झाकीर नाईकने 10 ते 15 वर्षांपूर्वी प्रवरा मेडिकल ट्रस्टला अडीच ते तीन कोटी रुपये दिले होते. त्याने ती देणगी दिली होती. ही देणगी 400 कोटी नव्हती. त्यानंतर या प्रकरणी चौकशी झाली होती. भारत सरकारने चौकशीदेखील केली होती. भारत सरकारने याप्रकरणी चौकशी पूर्ण करुन 10 वर्षापूर्वीच केस बंद केली.”

Published on: Jun 23, 2023 10:34 AM