खाते वाटपात महायुतीत तिढा, महसूल खातं अजित पवार यांच्याकडे जाणार? राधाकृष्ण विखे पाटील म्हणतात…
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड केलं आहे. अजित पवार आपल्या काही आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहेत. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची तर आठ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यामुळे अजित पवार आणि इतर नेत्यांना कोणती खाती मिळणार याकडे राज्याच लक्ष लागलं आहे.
मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड केलं आहे. अजित पवार आपल्या काही आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहेत. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची तर आठ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यामुळे अजित पवार आणि इतर नेत्यांना कोणती खाती मिळणार याकडे राज्याच लक्ष लागलं आहे. अजित पवार यांच्या गटाला 11 खाते दिली जाणार आहेत. सुत्रांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार अजित पवार यांना महसूल खातं मिळण्याची शक्यता आहे. सध्या हे खात राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे आहे. याच पार्श्वभूमीवर राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पक्षश्रेष्ठी घेतील तो निर्णय अंतिम असेल. शेवटी संघटनेत पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतात तो राज्यहिताचा असतो. आम्ही तो अमान्य करण्याचा प्रश्नच येत नाही, असं विखे पाटील म्हणाले.
Published on: Jul 05, 2023 12:11 PM
Latest Videos