औरंगजेबाच्या कबरीवर फुलं वाहणाऱ्यांना उत्तरं द्यायला आम्ही बांधिल नाही!; भाजप नेत्याचं संजय राऊतांवर टीकास्त्र

औरंगजेबाच्या कबरीवर फुलं वाहणाऱ्यांना उत्तरं द्यायला आम्ही बांधिल नाही!; भाजप नेत्याचं संजय राऊतांवर टीकास्त्र

| Updated on: Feb 16, 2023 | 3:47 PM

भाजपचे वरिष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिवसेना ठाकरेगटाचे नेते, खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केला आहे. तसंच पहाटेच्या शपथविधीवरही विखे पाटील बोललेत. पाहा...

भाजपचे वरिष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिवसेना ठाकरेगटाचे नेते, खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केला आहे. संजय राऊत कोण आहे? त्याला इतके महत्व का दिलं जातं? अडीच वर्षे त्यांचं सरकार होतं. तेव्हा ते औरंगजेबाच्या कबरीवर फुले वाहत होते. त्यामुळे संजय राऊत काय म्हणतात याला उत्तर द्यायला आम्ही बांधील नाही, असं विखे पाटील म्हणालेत. तसंच पहाटेच्या शपथविधीवरही विखे पाटील बोललेत. देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय स्पष्ट भाषेत उत्तर दिलेलं आहे. प्रत्येकाची एक वेगळी राजकीय भूमिका असते, असं विखे पाटील म्हणालेत.

Published on: Feb 16, 2023 03:47 PM