...अशी कामं शरद पवार नेहमी करतात, मुस्लिम, ख्रिश्चन वक्तव्यावर राधाकृष्ण विखे पाटील यांची टीका

“…अशी कामं शरद पवार नेहमी करतात”, मुस्लिम, ख्रिश्चन वक्तव्यावर राधाकृष्ण विखे पाटील यांची टीका

| Updated on: Jun 08, 2023 | 10:58 AM

शरद पवार यांनी मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्मीय नागरिकांबद्दल महत्त्वाचं वक्तव्य केलं.“देशात सध्या मुस्लिम आणि ख्रिश्चन या दोन धर्मांबाबत चिंता वाटावी, अशी परिस्थिती आहे, असं शरद पवार म्हणाले. यावर राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अहमदनगर : शरद पवार यांनी मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्मीय नागरिकांबद्दल महत्त्वाचं वक्तव्य केलं.“देशात सध्या मुस्लिम आणि ख्रिश्चन या दोन धर्मांबाबत चिंता वाटावी, अशी परिस्थिती आहे, असं शरद पवार म्हणाले. यावर राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “शरद पवारांच्या वक्तव्याचे आश्चर्य वाटतंय. त्यांना मागच्या घटनांचा विसर पडलेला दिसतोय.धर्मांतर आणि लव्ह जिहादच्या घटना सातत्याने घडत आहेत. हिंदुविरोधी वक्तव्य करणाऱ्या उस्मान सर्जीलची सभा आपल्याच काळात झाली.काही लोकांना सन्मानित करून आपल्या समाजाला अवमानित करायचं.हे काम पवार सातत्याने करताय. लव्ह जिहाद, धर्मांतर यावर तुमची आणि पक्षाची भुमिका स्पष्ट करा.मविआ सरकारमध्ये औरंगजेबाच्या कबरीवर फुले वाहिली जात होती. त्याचे उदात्तीकरण तुम्ही करत होता हे विसरला का?.मविआच्या काळात देवभक्ती करणाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले.अल्पवयीन मुलींच्या बाबतीत घडलेल्या प्रकरणावर ते काही बोलत नाही. पवारांचा दुटप्पीपणा लोकांना माहीत आहे”, असं राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे.

Published on: Jun 08, 2023 10:58 AM