“जनतेच्या भावनेचा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी आदर केला”, अहमदनगरच्या नामांतरावर कोणी केले कौतुक
अहमदनगरच्या नामांतरावरून महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जिल्ह्यासाठी हा ऐतिहासिक क्षण आहे. ऐतिहासिक नगरीला पुण्यश्लोक अहिल्यादेवीचे नाव द्यावे यासाठी गोपीचंद पडळकर यांनी मागणी केली होती. त्याचबरोबर जिल्ह्याचे सुपुत्र राम शिंदे यांनी ती मागणी उचलून धरली.
अहमदनगर : अहमदनगरच्या नामांतरावरून महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जिल्ह्यासाठी हा ऐतिहासिक क्षण आहे. ऐतिहासिक नगरीला पुण्यश्लोक अहिल्यादेवीचे नाव द्यावे यासाठी गोपीचंद पडळकर यांनी मागणी केली होती. त्याचबरोबर जिल्ह्याचे सुपुत्र राम शिंदे यांनी ती मागणी उचलून धरली. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी अहिल्यादेवींच्या 298 व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या भावनेचा आदर करत अहिल्यानगर नावाची मागणी पूर्ण केली. आमच्या दृष्टीने हा भाग्याचा क्षण होता. हा निर्णय आमच्या काळात झाला याचा विशेष आनंद आहे, असं राघाकृष्ण विखे पाटील म्हणाले.
Published on: Jun 01, 2023 09:54 AM
Latest Videos