Raghunath Kuchik लैंगिक अत्याचार प्रकरणी पीडित तरुणीचा रविवारपर्यंत अल्टीमेटम
रविवारपर्यंत मी कुचिक यांच्या प्रतिसादाची वाट बघणार आहे. त्यांनतर केस मागे घेण्यासंदर्भात निर्णय घेणार असल्याचे पीडित तरुणीने म्हटले आहे. यावेळी पीडित तरुणीने भाजपा नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्याविरोधात लवकरच गुन्हा दाखल करणार असल्याचे म्हटले आहे.
पुणे : शिवसेना (Shivsena) उपनेते रघुनाथ कुचिक (Raghunath Kuchik) लैंगिक अत्याचार प्रकरणी पीडित तरुणीने आज पुन्हा एकदा रघुनाथ कुचिक यांच्यावर आरोप करत त्यांना रविवारपर्यंतचा अल्टीमेटम दिला आहे. रविवारपर्यंत मी कुचिक यांच्या प्रतिसादाची वाट बघणार आहे. त्यांनतर केस मागे घेण्यासंदर्भात निर्णय घेणार असल्याचे पीडित तरुणीने म्हटले आहे. यावेळी पीडित तरुणीने भाजपा नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्याविरोधात लवकरच गुन्हा दाखल करणार असल्याचे म्हटले आहे. एवढेच नाही, तर वाघ यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार असल्याचेही तिने म्हटले आहे. चित्रा वाघ यांनी आपल्याला खोटे बोलायला भाग पाडले. आपल्याला गोव्यात तसंच मुंबईत चित्रा वाघ यांच्या मदतीने डांबून ठेवले. पोलिसांना विशिष्ट जबाब देण्यास वाघ यांनीच सांगितल्याचा गंभीर आरोप पीडित तरुणीने केला होता.
Latest Videos