खासदारकी बहाल होताच राहुल गांधी पुन्हा संसदेत; इंडिया आघाडीच्या खासदारांकडून जंगी स्वागत
काँग्रेस नेते राहुल गांधी यांना खासदारकी बहाल करण्यात आली आहे. त्यामुळे राहुल गांधी संसदेत दाखल झाले आहेत.काँग्रेस खासदारांकडून त्यांचं स्वागत करण्यात आलं आहे. इंडिया आघाडीच्या खासदारांनी सुध्दा त्यांचं स्वागत केलं आहे.
नवी दिल्ली, 7 ऑगस्ट 2023 | काँग्रेस नेते राहुल गांधी यांना खासदारकी बहाल करण्यात आली आहे. त्यामुळे राहुल गांधी संसदेत दाखल झाले आहेत.काँग्रेस खासदारांकडून त्यांचं स्वागत करण्यात आलं आहे. इंडिया आघाडीच्या खासदारांनी सुध्दा त्यांचं स्वागत केलं आहे. राहुल गांधी यांनी महात्मा गांधी यांच्या पुतळ्याचं दर्शन घेतलं आहे. मोदी आडनावा प्रकरणी राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. राहुल गांधी यांची 24 मार्च रोजी खासदारकी रद्द करण्यात आली होती.त्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती. त्यानंतर राहुल गांधी यांची खासदारकी बहाल करण्यात आली आहे. राहुल गांधी यांची खासदारकी बहाल होताच काँग्रेस कार्यकर्त्यांनी देशभर जल्लोष करून आनंद साजरा केला.
Published on: Aug 07, 2023 12:37 PM
Latest Videos