राहुल गांधींची इडी चौकशी; नाना पटोले म्हणतात…
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यामागे ईडीचा ससेमिरा (rahul gandhi ed inquiry) लागल्यानंतर कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात मुंबई येथे मोर्चा (nana patole morcha) काढण्यात आला आहे. काँग्रेसच्या अनेक नेत्यांसह मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले आहे. राहुल गांधी यांचा आवाज दाबण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणेचा सरकार गैरवापर करीत असल्याचा आरोप […]
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यामागे ईडीचा ससेमिरा (rahul gandhi ed inquiry) लागल्यानंतर कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात मुंबई येथे मोर्चा (nana patole morcha) काढण्यात आला आहे. काँग्रेसच्या अनेक नेत्यांसह मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले आहे. राहुल गांधी यांचा आवाज दाबण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणेचा सरकार गैरवापर करीत असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला आहे. सर्वसामान्यांच्या मूलभूत प्रश्नावरून लक्ष हटविण्यासाठी केंद्र सरकारची ही हुकूमशाही असल्याचा आरोपही नाना पाटोले यांनी केला आहे. तत्पूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी आंदोलन करण्यासाठी नाना पटोले हे त्यांच्या निवासस्थानातून निघाले होते. त्यांच्यासोबत शेकडो वारकरी आणि काँग्रेस कार्यकर्ते टाळमृदुंग वाजवत होते. पटोले हे पायीच सागर निवासस्थानाकडे निघाले होते. तितक्यात पोलिसांनी त्यांना अडवलं आणि सागर निवासस्थानाकडे जाण्यास मज्जाव केला.