आधी बाळासाहेब थोरातांचं पक्षश्रेष्ठींना पत्र, आता राहुल गांधी आणि नाना पटोलेंमध्ये फोनवरून चर्चा
राहुल गांधी आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यामध्ये फोनवरून चर्चा झाली आहे. काँग्रेसमध्ये घडामोडींना वेग आलाय. पाहा...
नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक अन् सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीवरून काँग्रेसचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात नाराज आहेत. त्यांनी तसं पत्रही पक्ष श्रेष्ठींना लिहिलंय.त्यानंतर आता राहुल गांधी आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यामध्ये फोनवरून चर्चा झाली आहे. उमेदवारीबाबत तुम्हीच निर्णय घ्या, यात दिल्लीतून हस्तक्षेप होणार नाही, असं राहुल गांधींनी पटोलेंना सांगितल्याची माहिती आहे. दरम्यान, काँग्रेस पक्षात सुरु असलेलं राजकारण योग्य नाही. हे सगळं असंच सुरु राहीलं तर लवकरच काँग्रेसमध्ये दोन गट पडतील, असं नाराजीचं बाळासाहेब थोरात यांनी पक्षश्रेष्ठींना लिहिलं आहे. त्यानंतर काँग्रेसमध्ये घडामोडींना वेग आलाय.
Latest Videos