Nana Patole : राहुल गांधी यांनी काँग्रेसचे अध्यक्ष व्हावे, कार्यकर्त्यांची हीच भावना – नाना पटोले
देशात काँग्रेसचे अध्यक्षपद राहुल गांधी यांनी स्वीकारावं, अशी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची भावना आहे, असं मत काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी दिल्लीत व्यक्त केलं. महागाई आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावर काँग्रेसनं आंदोलन केलं. त्यावेळी ते बोलत होते.
देशात काँग्रेसचे अध्यक्षपद राहुल गांधी यांनी स्वीकारावं, अशी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची भावना आहे, असं मत काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी दिल्लीत व्यक्त केलं. महागाई आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावर काँग्रेसनं आंदोलन केलं. त्यावेळी ते बोलत होते. नाना पटोले म्हणाले, केंद्रातलं मोदींचं सरकार हे फेल झालं आहे. महागाई, बेरोजगारी थांबवू शकत नाहीत. शेतकरी, महिला, विद्यार्थी यांच्या आत्महत्या होत आहेत. देशातील संविधानिक व्यवस्था बिघडविण्याचं काम या सरकारनं केलं आहे. महागाईच्या मुद्द्यावर राहुल गांधी यांच्या एका हाकेनं लोकं जमा झालेत. याचा अर्थ देशात लोकांना मोदी सरकार विरोधात चिड निर्माण झाली आहे. सात सप्टेंबरपासून कन्याकुमारी यात्रा सुरू होत आहे. याची धास्ती केंद्रानं घेतली आहे. मूळ मुद्द्याला बगल देण्याचा प्रयत्न भाजपकडून होताना दिसून येत आहे. मीपण भाजपच्या लोकांना भेटतो. पण, ईडीचं भाजपचं सरकार राज्यात आहे. त्यांनी कायदा, सुव्यवस्था मोडू नये, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.