Rahul Gandhi: काँग्रेसने जे 70 वर्षात कमावलं भाजपाने ते 8 वर्षात गमावलं- राहुल गांधी
देशात लोकशाही इतिहासजमा झाली असून काँग्रेसने जे 70 वर्षात कमावलं भाजपने ते 8 वर्षात गमावलं असे म्हणत राहुल गांधी यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले.
राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेऊन भाजपवर निशाणा साधला. जो सरकारच्या विरोधात बोलतो त्याच्यामागे सरकारी यंत्रणा लावल्या जातात, मात्र मी महागाई विरोधात लढणार असे राहुल गांधी म्हणाले. देशात हुकूमशाही सुरु असून महागाई विरोधात कुणीच बोलायला तयार नसल्याचे राहुल गांधी म्हणाले. सर्वाधिक बेरोजगारी आज भारतात असल्याचेही राहुल गांधी म्हणाले. स्टार्ट अप इंडिया आता कुठे आहे असा प्रश्नही त्यांनी सरकारला केला. मी जितका जास्त सर्वसामान्यांसाठी आवाज उठवेल तितके जास्त माझयावर आक्रमण होईल असेही राहुल गांधी यावेळी म्हणाले. देशात लोकशाही इतिहासजमा झाली असून काँग्रेसने जे 70 वर्षात कमावलं भाजपने ते 8 वर्षात गमावलं असे म्हणत राहुल गांधी यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले.
Published on: Aug 05, 2022 11:43 AM
Latest Videos