राहुल गांधी आज लोकसभेत बोलणार, मोदी सरकारविरोधातील अविश्वास प्रस्तावावर काय करणार भाष्य?

| Updated on: Aug 08, 2023 | 8:58 AM

VIDEO | मोदी सरकारविरोधातील अविश्वास प्रस्तावावर राहुल गांधी लोकसभेत बोलणार, दुपारी १२ वाजता लोकसभेत नेमकं काय करणार भाष्य?

मुंबई, ८ ऑगस्ट २०२३ | काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी आज दुपारी १२ वाजता लोकसभेत बोलणार आहे. लोकसभेत मोदी सरकारविरोधातील अविश्वास प्रस्तावावर राहुल गांधी नेमकं काय बोलणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहात दिल्ली सेवा विधेयक मंजूर झालं. आजपासून विरोधकांच्या वतीने आणण्यात आलेल्या अविश्वास प्रस्तावावर चर्चा होणार आहे. या चर्चेची सुरूवात खासदारकी पुन्हा बहाल करण्यात आलेले नेते राहुल गांधी करणार आहे. दुपारी १२ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत ही चर्चा सुरू असणार आहे. तर या झालेल्या चर्चेवर १० ऑगस्ट रोजी म्हणजे गुरूवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी अविश्वास प्रस्तावाला उत्तर देणार असल्याचे सांगितले जात आहे. मोदी आडनाव प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. त्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णयानंतर राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा दिलासा मिळाला आहे. राहुल गांधी यांना खासदारकी बहाल करण्यात आल्याने राहुल गांधी आज पुन्हा संसदेच्या अधिवेशनात दिसणार आहेत.

Published on: Aug 08, 2023 08:58 AM
raigad crime news : धबधब्याच्या डोहात भलतचं घडलं! मोठ्या भावाला वाचवायला गेला अन् दुर्दैवी घटना घडली
रविकांत तुपकर नॉट रिचेबल; आज भूमिका माडण्याची शक्यता…