पिंपरी-चिंचवड पोटनिवडणुकीच्या मतमोजणीवर राहुल कलाटे यांना आक्षेप; म्हणाले...

पिंपरी-चिंचवड पोटनिवडणुकीच्या मतमोजणीवर राहुल कलाटे यांना आक्षेप; म्हणाले…

| Updated on: Mar 02, 2023 | 11:33 AM

पिंपरी-चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीची आज मतमोजणी होत आहे. यात अश्विनी जगताप या आघाडीवर आहेत. या मतमोजणीवर अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनी आक्षेप घेतला आहे.

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीची आज मतमोजणी होत आहे. भाजप उमेदवार अश्विनी जगताप महाविकासआघाडीचे उमेदवार नाना काटे आणि अपक्ष राहुल कलाटे यांच्यात ही लढत होत आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. शंकर गावडे कामगार भवनात होणार मतमोजणी सुरू आहे. यात अश्विनी जगताप या आघाडीवर आहेत. या मतमोजणीवर अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांचा या मतमोजणीवर आक्षेप आहे. मी सध्या मतमोजणी केंद्राच्या बाहेर आहे. आत असलेल्या व्यक्तींकडून यावर सविस्तर बोलेन, असं कलाटे म्हणालेत.

Published on: Mar 02, 2023 11:29 AM