“लवकरच क्रांतिकारी निर्णय घेणार”; विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाकडे राज्याचे लक्ष!
16 आमदारांच्या अपात्रेच्या मुद्द्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना निर्णय घ्यायचा आहे. त्यामुळे भविष्यात राहुल नार्वेकर नेमका काय निर्णय घेणार याकडे राज्यातील विरोधकांसह सत्ताधाऱ्यांचेही लक्ष लागून राहिले आहे.दरम्यान राहुल नार्वेकर यांनी लवकरच क्रांतिकारी निर्णय घेणार असल्याचे सांगितल्याने आता चर्चेला उधान आले आहे.
मुंबई : शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रेच्या मुद्द्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना निर्णय घ्यायचा आहे. त्यामुळे भविष्यात राहुल नार्वेकर नेमका काय निर्णय घेणार याकडे राज्यातील विरोधकांसह सत्ताधाऱ्यांचेही लक्ष लागून राहिले आहे.दरम्यान राहुल नार्वेकर यांनी लवकरच क्रांतिकारी निर्णय घेणार असल्याचे सांगितल्याने आता चर्चेला उधान आले आहे.विधानसभेत बोलताना ते म्हणाले की, राहुल नार्वेकर यांनी विधानसभेत बोलताना सांगितल की,ज्या प्रमाणे 1977 साली बाळासाहेब देसाई यांनी ज्या प्रमाणे विधानसभेचे अध्यक्षपद भूषवले होते आणि क्रांतिकारी निर्णय घेतले होते, त्या प्रमाणे मी सुद्धा क्रांतिकारी निर्णय घेणार, चिंता करण्याची काहीही गरज नाही, आपण मेरिटनुसारच निर्णय घेणार आहे, असं राहुल नार्वेकर म्हणाले.त्यामुळे त्या अपात्र आमदारांच्या प्रलंबित प्रश्नावर राहुल नार्वेकर कोणता क्रांतिकारी निर्णय घेतात, याची उत्सुकता लागून राहिली आहे.