सर्व नियमांचं पालन करून अपात्रतेचा निर्णय घेणार, राहुल नार्वेकर यांची प्रतिक्रिया

“सर्व नियमांचं पालन करून अपात्रतेचा निर्णय घेणार”, राहुल नार्वेकर यांची प्रतिक्रिया

| Updated on: Aug 03, 2023 | 12:36 PM

शिवसेनेतील शिंदे गटातील 16 आमदारांना अपात्रेसंदर्भातील निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अद्याप घेतला नाही. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राहुल नार्वेकर यांच्यावर टीका केली. यावर आता राहुल नार्वेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबई, 03 ऑगस्ट 2023 | शिवसेनेतील शिंदे गटातील 16 आमदारांना अपात्रेसंदर्भातील निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अद्याप घेतला नाही. याच पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राहुल नार्वेकर यांच्यावर टीका केली.”16 आमदार कायद्याने अपात्र होतायत आणि त्यांना अपात्र ठरवण्याची हिंमत राहुल नार्वेकर यांच्यात दिसत नाही,” असं संजय राऊत म्हणाले. यावर आता राहुल नार्वेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “आमदार अपात्रतेचा मुद्दा सबज्युडाईज आहे. योग्य ती कारवाई केली जाईल यावर सार्वजनिकरित्या बोलणं योग्य ठरणार नाही.”

Published on: Aug 03, 2023 12:36 PM