अजित पवार की शरद पवार? खरा ‘राष्ट्रवादी’ कोण? विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणतात…
अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली सुरु झाल्या आहेत. दोन्ही गटाकडून आपलाच पक्ष राष्ट्रवादी असल्याचं सांगितलं जात आहे. तसेच हकालपट्टी आणि नवी नियुक्तीही केली जात आहे. . त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नेता नेमका कोण? हा प्रश्न आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या दालनात गेला आहे.
मुंबई: अजित पवार यांनी बंड करताच दोन तासात शरद पवार यांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांची विरोधी पक्षनेते आणि विधानसभेचे मुख्य प्रतोद म्हणून नियुक्तीही शरद पवार यांनी जाहीर केली. तर जयंत पाटील हेच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष असतील असे जाहीर केले. त्याचवेळी अजित पवार गटाने प्रदेशाध्यक्ष म्हणून सुनील तटकरे आणि विधानसभेत मुख्य प्रतोद म्हणून अनिल पाटील यांच्या नावाची घोषणा केली. दोन्ही गट आपलाच पक्ष राष्ट्रवादी असल्याचं सांगत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा नेता नेमका कोण? असा प्रश्न निर्माण झाला आहे. हा प्रश्न आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या दालनात गेला असून त्यांनी यावरून मोठे भाष्य केले आहे. राहुल नार्वेकर नेमकं काय म्हणाले यासाठी पाहा हा व्हिडीओ…
Published on: Jul 05, 2023 08:26 AM
Latest Videos