राहुल नार्वेकर यांना पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्ष पद, उद्धव यांना खिजवण्याची संपूर्ण तयारी

राहुल नार्वेकर यांना पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्ष पद, उद्धव यांना खिजवण्याची संपूर्ण तयारी

| Updated on: Dec 07, 2024 | 3:29 PM

शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष फोडल्यानंतर निर्माण झाल्या कायदेशीर पेच प्रसंगात महत्वाचा रोल अदा करणारे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याच गळ्यात पुन्हा विधानसभा अध्यक्ष पदाची माळ पडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या निर्णयातून महायुतीने उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न केला असल्याचे म्हटले जात आहे.

भाजपाला १३२ आमदारांचा मोठं बहुमत असल्याने राहुल नार्वेकर यांना पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्षपद देण्याची रणनिती आखली जात आहे. महाविकास आघाडी सरकारमधील दोन पक्ष फोडल्यानंतर खरा पक्ष कोणता? विधीमंडळ पक्ष की राजकीय पक्ष यांचा फैसला आमदार पक्षांतर बंदी कायद्याचे उल्लंघन झाले की नाही यांचा निवाडा करण्यात राहुल नार्वेकर यांची मोठी मदत झाली होती. त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्ष करण्याची तयारी महायुतीने केली आहे. राहुल नार्वेकर यांना खरे तर मंत्री पदाची आस लागली होती. परंतू त्यांचे वकीली कौशल्य पाहाता त्यांची विधीमंडळात सत्ताधारी पक्षाला मोठी गरज लागणार आहे. त्यामुळे राहुल नार्वेकर यांना पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्ष पदाचा अर्ज भरण्यास सांगण्यात आले आहे. काळीदास कोळंबकर हंगामी विधानसभा अध्यक्ष आहेत, त्यांना राजीनाम द्यायला सांगून राहुल नार्वेकर अर्ज भरणार आहेत.

Published on: Dec 07, 2024 03:21 PM