16 MLAs Disqualification Case : 16 आमदारांच्या अपात्रतेवर वेळ निघून गेली? मग कारवाई कधी? राहुल नार्वेकर म्हणतात…
सत्ता संघर्षापासून आत्ता पर्यंत शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेचा आणि मूळ पक्षाचा मुद्दा हा रखडला आहे. तर यावर अजूनही विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निर्णय घेतलेला नाही. पण त्यावर त्यांनी कारवाई सुरू केली आहे.
मुंबई : 23 ऑगस्ट 2023 | सत्तासंघर्षाच्या सुनावणीनंतर शिंदे गटातील 16 आमदारांच्या अपात्रतेचं प्रकरण हे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे गेलं. तर त्यावेळी अध्यक्ष नार्वेकरांना यावर योग्य त्या कालावधीत निर्णय घेण्याच्या सुचना न्यायालयाने दिल्या होत्या. पण त्यात कोणतीच कारवाई होत नसल्याने ठाकरे गटाने पुन्हा एकदा न्यायालयाचे दारे ठोठावली होती. तोच पावसाळी अधिवेशनाच्या आधी नार्वेकरांनी शिंदे गट आणि ठाकरे गटातील अपात्र आमदारांनी नोटीस बाजावली होती. तर त्यावर लेखी उत्तर देण्याच्या सुचना केल्या होत्या. त्यावर शिंदे गटाकडून वेळ वाढवून मागण्यात आली होती. यावरून आपण दोन्ही गटाचे म्हणण हे समक्ष ऐखणार असे नार्वेकरांनी मध्यंतरी म्हटलं होतं. त्यानंतर आता यावरून नार्वेकर यांनी पुन्हा एकदा उचित कारवाई चालू आहे. तर आपात्रतेच्या कारवाईच्या संदर्भात मला भान आहे. त्यामुळे यासंदर्भात अधिक चर्चा न करता योग्य कायदेशीर आणि योग्य कारवाई आपण करू.