Pune : पावसाचा कहर, जन्नुर परिसरात पाणीच-पाणी
पुणे जिल्ह्यातील जन्नुर परिसरात झालेल्या पावसामुळे जिल्हा परिषदेत पाणीच-पाणी अशी स्थिती झाली होती. तर शाळेची संरक्षण भींतही कोसळली होती. त्यामुळे उघड्यावर वर्ग भरवण्याची वेळ शाळा प्रशासनावर आली आहे. तर वाजेवाडी परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे.
पुणे : राज्यात (Rain) पावसाचे पुनरागमन झाले आहे. 15 दिवस विश्रांती दिल्यानंतर राज्यातील विविध भागांमध्ये पावसाने हजेरी लावलेली आहे. असे असले तरी (The vagaries of the monsoon) मान्सूनचा लहरीपणा हा सुरुच आहे. पावसाच्या प्रमाणात कमालीची तफावत आहे. (Pune District) पुणे जिल्ह्यातील जन्नुर परिसरात झालेल्या पावसामुळे जिल्हा परिषदेत पाणीच-पाणी अशी स्थिती झाली होती. तर शाळेची संरक्षण भींतही कोसळली होती. त्यामुळे उघड्यावर वर्ग भरवण्याची वेळ शाळा प्रशासनावर आली आहे. तर वाजेवाडी परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. पाऊस परतल्याने खरीप हंगामातील पिकांना जीवदान मिळाले असले तरी अनेक शहरी भागात नुकसान तर झालेच आहे पण तारांबळही उडाली आहे. शिवाय आणखी चार दिवस पावसामध्ये सातत्य राहणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
Published on: Sep 11, 2022 09:15 PM
Latest Videos