Rain Update | मुंबई, नवी मुंबईत जोरदार पाऊस, सखल भागात पाणी साचले
गेल्या दोन दिवसांपासून तुफान बॅटींग करणाऱ्या पावसाने मुंबईसह ठिकठिकाणी हजेरी लावली. यामुळे मुंबईतील हिंदमाता, परेल, सायन, किंग्ज सर्कल यासारख्या सखल भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. (Mumbai Heavy rainfall)
मुंबई : मुंबई शहरासह पश्चिम उपनगरात पहाटेपासून मुसळधार पावसाची सुरुवात झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून तुफान बॅटींग करणाऱ्या पावसाने मुंबईसह ठिकठिकाणी हजेरी लावली. यामुळे मुंबईतील हिंदमाता, परेल, सायन, किंग्ज सर्कल यासारख्या सखल भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. हवामान विभागाने मुंबई, ठाण्यासह कोकणात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर संपूर्ण महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. (Mumbai Heavy rain lashes in city)
Latest Videos