Rain Update : बदलापूर अंबरनाथमधील रेल्वे रुळ पाण्याखाली, नेमकी काय स्थिती आहे जाणून घ्या
कोकण किनारपट्टीत पावसाचा जोर वाढल्याचं दिसत आहे. बदलापूर अंबरनाथ परिसरातही अतिवृष्टी सुरु आहे. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे.
मुंबई : कोकण किनारपट्टीत पावसाचा जोर वाढला आहे. रायगडमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आल्याने राज्य सरकार आणि मदत यंत्रणा सज्ज झाली आहे. रायगडमधील पूरस्थितीचा आढावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला आहे.सतर्क राहून लोकांना मदत करण्याचे आदेश अजित पवार यांनी दिले आहेत. रत्नागिरीत पावसाने जोरदार हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे. दुसरीकडे, बदलापूर अंबरनाथ येथे अतिवृष्टीमुळे रेल्वे पाण्याखाली गेले आहेत. यामुळे रेल वाहतूक विस्कळीत झाली आहे. लाईफलाईन खोळंबल्याने अनेकांना रेल्वे स्थानकातूनच घरी परतावं लागलं. तर मुंबईत कामासाठी आलेल्या चाकरमान्यांचे हाल होणार आहे. गुडघाभर पाणी रेल्वे ट्रॅकवर साचल्याची स्थिती आहे.
हवामान खात्याने येत्या काही तासात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे आवश्यकता असेल तेव्हाच घरातून बाहेर पडा. तसेच सुरक्षित ठिकाणी राहा.