Jalgaon | जळगावच्या रावेरमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस
जळवागातील रावेर येथे अनेक ठिकाणी झाडे कोसळून वीजतारा तुटल्याने वीज पुरवठा खंडित झाला आहे. तसेच तालुक्यात काही गावांमध्ये शेतीचे मोठ्या प्रमाणात नुसकान झाले असून केळी बागांचे नुकसान झाल्याचे समोर आहे आले.
जळवाग : ऊन व उकाड्याने हैराण झालेल्या शहरवासीयांना आज वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे दिलासा मिळाला. विजांचा चमचमाट व ढगांच्या गडगडाटासह वरुणराजाचे आगमन झाले. दरम्यान पाऊस झाल्याने शहर व परिसरात आनंदाचे वातावरण होते. तर जळगाव जिल्ह्यात वादळ आणि अवकाळी पावसाने (unseasonal rain) जोरदार हजेरी लावली ज्यामुळे शहरातील अनेक ठिकाणी लाखोंचे नुकसान झालं. वादळामुळे शहरातील काही घरांचे पत्रे उडून नुकसान झालं आहे. असेच नुकसान आहेरवाडी गावात झाले आहे. येथे घराचे पत्रे उडाले. ज्यामुळे एक तरूण जखमी झाला आहे. तर जळवागातील रावेरला पावसाचा फटका बसला आहे. येथे केळी बागांचे (banana orchard) नुकसान झाल्याचे समोर आहे आले. तर विजपुरवठा (Power supply) देखील खंडीत झाला आहे.
Published on: May 31, 2022 08:38 PM
Latest Videos