एका आठवड्यातच ‘हा’ डॅम भरला; वाहनांच्या लांबच लांब रांगा; तर पर्यटकांच्या गर्दीने परिसर हाऊस फुल्ल
पावसाळ्यात गर्दीच गर्दीच असते. आताही येथेही येथे टायगर पॉइंट मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. ज्यामुळे वाहतूक कोंडी पहायला मिळत आहे. तर याचा परिणाम थेट वाहतुकिवर झाला असून वाहतूक संथ गतीने सुरू आहे.
लोणावळा : पुणे, मुंबई करांसाठी वर्षा ऋतूत वर्षाविहाराचं हक्काचं स्थान म्हणजे लोणावळा. येथे त्यामुळेच पावसाळ्यात गर्दीच गर्दीच असते. आताही येथेही येथे टायगर पॉइंट मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. ज्यामुळे वाहतूक कोंडी पहायला मिळत आहे. तर याचा परिणाम थेट वाहतुकिवर झाला असून वाहतूक संथ गतीने सुरू आहे. तर हे सर्व फक्त येथील भुशी धरण ओव्हरफ्लो झाल्याने पहायला मिळत आहे. तर ओव्हरफ्लो भुशी धरणाकडे जाण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने लोणावळ्यात येत आहेत. त्यामुळे लोणावळ्यातील नौसेना बाग पर्यंत पाच तव सहा किलोमीटर वाहतूक कोंडी झाली आहे. तर गेल्या आठ दिवसात झालेल्या जोरदार पावसामुळेच भुशी डॅम ओव्हरफ्लो झाला आहे. ज्यामुळे पर्यटकांच्या आनंदाला उधाण आले आहे. पावसाची संततधार सुरू असल्याने इतर ठिकाणी धबधबे कोसाळायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे लोणावळा-खंडाळा परिसराचे निसर्ग सौंदर्य खुलले आहे.