Raj Thackeray Ayodhya Tour | Raj Thackeray अयोध्या दौरा तूर्तास स्थगित, सूत्रांची माहिती
आता पुण्यात 22 मे रोजी राज ठाकरेंची सभा होणार आहे. या सभेची जय्यत तयारी पुण्यात मनसैनिकांकडून करण्यात येतेय. या सभेमध्ये राज ठाकरे आपल्या अयोध्या दौऱ्याबाबत सविस्तर भूमिका मांडणार आहेत.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपला अयोध्या दौरा (Raj Thackeray Ayodhya Tour) स्थगित केला आहे. तूर्तास हा दौरा स्थगित केला असल्याची घोषणा राज ठाकरेंनी सोशल मीडियावर पोस्ट करत दिली आहे. 5 जून रोजी राज ठाकरेंचा अयोध्या दौरा होणार होता. हा दौरा तूर्तास स्थगित करण्यात आला आहे. 22 मे रोजी पुण्यात होणाऱ्या सभेत राज ठाकरे आपल्या अयोध्या दौऱ्याबाबत सविस्तर भूमिका मांडणार आहेत. 5 जून रोजी होणारा राज ठाकरे (Raj Thackeray News) यांचा अयोध्या दौरा तूर्तास स्थगित होण्याची शक्यता टीव्ही 9 मराठीच्या विश्वसनीय सूत्रांनी वर्तवली होती. त्यानंतर राज ठाकरे यांनी शुक्रवारी सकाळी ठीक दहा वाजता याबाबत ट्वीट (Raj Thackeray Tweet) केलंय. अयोध्या दौरा स्थगित करत असल्याची अधिकृत घोषणा राज ठाकरे यांनी केली. आता पुण्यात 22 मे रोजी राज ठाकरेंची सभा होणार आहे. या सभेची जय्यत तयारी पुण्यात मनसैनिकांकडून करण्यात येतेय. या सभेमध्ये राज ठाकरे आपल्या अयोध्या दौऱ्याबाबत सविस्तर भूमिका मांडणार आहेत.