वसंत मोरे यांच्या बारामती लोकसभा उमेदवारीवर राज ठाकरे याचं शिक्कामोर्तब? म्हणाले...

वसंत मोरे यांच्या बारामती लोकसभा उमेदवारीवर राज ठाकरे याचं शिक्कामोर्तब? म्हणाले…

| Updated on: Oct 19, 2023 | 8:54 PM

देशात आणि राज्यात काय चालू आहे. काही कळत नाही. राजकारणाचा विचका करून टाकला आहे. त्यातून महाराष्ट्राला बाहेर काढू. यांना यांची जागा दाखवून द्यायची आहे. जसे तुमचे काम होईल त्याचा मी आढावा घेईन, असे राज ठाकरे म्हणाले.

पुणे | 19 ऑक्टोंबर 2023 : बारामती लोकसभा मतदारसंघ कार्यालयाचे उद्घाटन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी बारामतीमधून लोकसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक असेलेले मनसे नेते वसंत मोरे याचे कौतुक केले. आजचा कार्यक्रम फक्त कार्यालयाच्या उदघाटनाचा आहे. वसंत मोरे अतिशय शिस्तबद्ध आहे. बारामतीमध्ये अजित पवार सापडावा. मला माहिती नाही आमच्याकडे पण अजित पवार आहेत. पण, आयुष्यात मला कधी काका म्हणू नको अशी मिश्कील टिपण्णी राज ठाकरे यांनी केली. महापालिका निवडणुका कधी होतील ते माहिती नाही. 2025 मध्ये होतील असे मला एकाने सांगितले. बारामती मतदारसंघात चांगले कार्यालय बांधलं आहे. मलाही वाटलं हे आता कुठल्या पक्षात जातात की काय? हा आपला बरोबरचा सहकारी आहे असे म्हणत राज ठाकरे यांनी वसंत मोरे यांचे कौतुक केले.

Published on: Oct 19, 2023 08:54 PM