“रामाचा वनवास 14 वर्षांचा होता, पण वांद्रे वरळी सी लिंक…”, पाहा राज ठाकरे यांनी सांगितलेले रामायण
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी राज ठाकरेंनी पुण्यातील विभाग अध्यक्षांसोबत बैठक घेतली. या बैठकीनंतर राज ठाकरेंनी माध्यमांशी संवाद साधला.
पुणे, 26 जुलै 2023 | मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी राज ठाकरेंनी पुण्यातील विभाग अध्यक्षांसोबत बैठक घेतली. या बैठकीनंतर राज ठाकरेंनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी राज ठाकरे यांनी मनसे युवा नेते अमित ठाकरे यांच्या टोलनाका तोडफोड प्रकरणावरून भाजप आणि राज्य सरकारवर टीका केली. राज ठाकरे म्हणाले, राज्यातील खराब रस्ते असणे हे फेलुअर असून मुंबई-गोवा महामार्ग बनवण्यासाठी 17 वर्ष लागतात? प्रमू राम वनवासाला गेल्यापासून ते सीता मातेला घेऊन आले. त्याला 14 वर्ष लागली. यात प्रभू रामांनी मोठा सेतू देखील बांधला. पण, मुंबईचा वांद्रे वरळी सी लिंक बांधण्यासाठी 10 वर्षे लागली, असे राज ठाकरेंनी उपहासात्मक म्हणाले. मुंबई-गोवा महामार्गाला 17 वर्षे झाली, तरही तो अजून तो पूर्ण होत नाही. बुहतेक तेच पुढारलेले होते.”
Published on: Jul 26, 2023 01:26 PM
Latest Videos