Adv. Gunratna Sadavarte : राज ठाकरे यांना काही विशेष अधिकार बहाल नाही; गुणरत्न सदावर्ते डाफरले
Gunratna Sadawarte On Raj Thackeray : एकीकडे मराठीच्या मुद्द्यावर मनसे आक्रमक झालेली आहे. तर दुसरीकडे यावरूनच आज अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी राज ठाकरे यांच्यावर संताप व्यक्त केला आहे.
राज ठाकरे यांना काही विशेष अधिकार नाहीत, असं अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी म्हंटलं आहे. राज ठाकरेंची टोळकी बँकांमध्ये जाऊन धुडगूस घालते आहे, याबाबत मुख्यमंत्र्यांना आणि पोलीस महासंचालकांना निवेदन देणार असल्याचं देखील सदावर्ते यांनी यावेळी बोलताना म्हंटलं आहे.
यावेळी बोलताना सदावर्ते म्हणाले की, राजकारणी म्हणून राज ठाकरे यांना काही विशेष अधिकार बहाल नाही. राज ठाकरे सुद्धा एक सामान्य भारतीय नागरिक असू शकतो. त्यांची टोळकी जमून बँकेत जाताय, बँकेच्या अधिकाऱ्यांना धमकवता, महिलांना माफी मागायला लावतात. कर्मचाऱ्यांना मारता, तुम्ही न्याय देवता आहेत का? हे चालणार नाही. याला कायदेशीर उत्तर म्हणून मी मुख्यमंत्र्यांना आणि पोलीस महासंचालकांना याबद्दल कारवाईचं निवेदन देणार आहे, असं गुणरत्न सदावर्ते यांनी म्हंटलं.