‘कलाकारांची किंमत सरकारला नाही’; राज ठाकरे यांची घणाघाती टीका

‘कलाकारांची किंमत सरकारला नाही’; राज ठाकरे यांची घणाघाती टीका

| Updated on: Jun 20, 2023 | 3:08 PM

हे प्रदर्शन मुंबईतल्या जहांगीर आर्ट गॅलरी येथे भरवण्यात आले होते. यावेळी राज ठाकरे यांनी लोकांसह सरकारवर निशाना साधला. त्यांनी सरकारला कलाकारांची किंमत नसते असं म्हटलं आहे.

मुंबई : दिवंगत चित्रकार रवी परांजपे यांच्या चित्रकृतींचं प्रदर्शनाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थिती लावली. हे प्रदर्शन मुंबईतल्या जहांगीर आर्ट गॅलरी येथे भरवण्यात आले होते. यावेळी राज ठाकरे यांनी लोकांसह सरकारवर निशाना साधला. त्यांनी सरकारला कलाकारांची किंमत नसते असं म्हटलं आहे. तर आपल्याकडे उत्तम चित्रकार आहेत. शिल्पकार आहेत. त्यांना सरकारनं प्रोत्साहित केलं पाहिजे. प्रदर्शनासाठी सरकारनं केंद्र उभारली पाहिजेत. मात्र कोणत्याच सरकारांना आपल्या देशातील कलाकारांची किंमत नाही असे ते म्हणाले. तर हेच रवी परांजपे फ्रान्समध्ये असते, इंग्लडमध्ये असते तर त्यांच्या पेटिंग्सची काय व्हॅल्यू असती? काय प्रकारे प्रेझेंट केलं असतं? याचा विचारही न केलेला बरा”, असं राज ठाकरे म्हणाले.

Published on: Jun 20, 2023 03:08 PM