Video | 'सगळे आतून एकच आहेत. तुम्हाला फक्त...,' काय म्हणाले राज ठाकरे

Video | ‘सगळे आतून एकच आहेत. तुम्हाला फक्त…,’ काय म्हणाले राज ठाकरे

| Updated on: Mar 09, 2024 | 2:05 PM

राज ठाकरे यांनी नाशिक येथील वर्धापन दिनात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले की अलिकडे कोण कोणाच्या गटात आहे हे कळतच नाही. मी कल्याण-डोंबिवली आणि नाशिक दौरा केला तेव्हा नमस्कार करताना माता भगिनी माझे हात धरत मला म्हणाल्या की...

नाशिक | 9 मार्च 2024 : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 18 वा वर्धापन दिवस आज नाशिक येथे संपन्न झाला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. आपण कल्याण-डोंबिवली आणि नाशिक येथे गेलो होतो. तेव्हा मी नमस्कार केला तेव्हा अनेक माता भगिनींनी मी नमस्कार केल्यावर दोन्ही बाजूंनी माझे हात धरत आता विश्वास फक्त तुझ्यावरच राहीलाय अशा म्हणाल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले. हा विश्वास टीकविणे महत्वाचे आहे. त्याची शपथ घ्यायची आहे. बाकीच्यांनी विश्वास गमावला आहे. कोण कुठे आहे हेच कळत नाही. कुणाचं नाव घेतलं तर तो कुठे आहे हे विचारावं लागते असे राज ठाकरे यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, त्या दिवशी नाट्यसंमेलनात आपल्याला पाच नगरसेवक भेटायला आले. म्हणाले, नमस्कार साहेब, आम्ही राष्ट्रवादीचे नगरसेवक. म्हटलं बरं. कुणाचे? त्यातील तीन म्हणाले आम्ही शरद पवार यांचे. दोन म्हणाले अजित पवार यांचे. आले होते मात्र एकत्र. माझं ठाम मत आहे, अजूनही आतून सर्व एकच आहेत. फक्त तुम्हाला वेडं बनवलं जात आहे. मूर्ख बनवलं जात आहे. त्यांचं राजकारण सुरू आहे. महाराष्ट्राची माती होते. महाराष्ट्र एकसंघ राहू नये म्हणून जातीचं विष पेरलं जातं असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला.

Published on: Mar 09, 2024 02:00 PM