‘टोलनाका फोडल्यावरून बोलणाऱ्यांनी आधी पक्ष बांधायला शिका’; राज ठाकरे यांचा भाजपला खरमरित सल्ला
मुंबई गोवा महामार्गावरून मनसेने निर्धान मेळावा आयोजित केला होता. त्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी भाजपसह शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला. तर टोलनाक्या फोडीवरून टीका करणाऱ्या भाजपला खडेबोल सुनावले आहेत.
पनवेल : 16 ऑगस्ट 2023 | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना आज पनवेलमध्ये जोरदार बॅटींग केली. पनवेलच्या वासुदेव बळवंत फडके सभागृहात मनसेच्या निर्धार मेळाव्यातून भाजपचा खरपूस समाचार घेतला. तर टोलनाका फोडल्यावरून ज्या भाजपने अमित ठाकरे यांच्यावर टीका केली होती. त्या टीकेला राज ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. यावेळी त्यांनी, अमित ठाकरे निघताच टोलचा स्फोट झाला. त्यावर भाजपने लगेचच टीका करताना, रस्ते आणि टोलनाके बांधायला शिका अशी टीका केली होती. तर त्यांनी आता इतर पक्षाच्या आमदारांना न फोडता त्यांचा पक्ष बांधायला शिकायला हवं असा टोला लगावला आहे. दुसऱ्या पक्षातील लोकांच्या कनपट्टीवर बंदुका ठेवायच्या आणि आतमध्ये आणायचं असा हल्लाबोल केला आहे. त्याचवेळी त्यांनी अजित पवार यांच्यावर देखील टोमना मारताना, तेच लोक गाडीत झोपून जातात असं म्हटलं आहे.