‘आधी जेलमध्ये टाकायची भाषा करायची आणि मग.. युती’; राज ठाकरे यांची घणाघाती टीका
यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेत पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं देताना भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार टीका केली. याचदरम्यान त्यांनी भाजपवर टीका करताना अजित पवार यांच्या सत्तेतील प्रवेशावरून टोला लगावला आहे.
पुणे | 26 जुलै 2023 : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे हे सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. आगामी निवडणुकीसाठी राज ठाकरे पक्षबांधणी करण्यासाठी पुण्यात आले होते. यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेत पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं देताना भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार टीका केली. याचदरम्यान त्यांनी भाजपवर टीका करताना अजित पवार यांच्या सत्तेतील प्रवेशावरून टोला लगावला आहे. यावेळी राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अजित पवार आणि राष्ट्रवादीच्या भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर बोट ठेवताना टीका केली. ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले, ज्यांना जेलमध्ये टाकू असे म्हटलं आज त्यांच्याचबरोबर युती केलीत असा घणाघात करताना. जसा समाज असतो तसंच सरकार मिळतं असा टोला त्यांनी जनतेला लगावला आहे.
Published on: Jul 26, 2023 01:56 PM
Latest Videos