‘महाराष्ट्राचा हातात काय लागणार घंटा’; राज ठाकरे यांचा संतप्त सवाल?

‘महाराष्ट्राचा हातात काय लागणार घंटा’; राज ठाकरे यांचा संतप्त सवाल?

| Updated on: Jul 16, 2023 | 1:47 PM

राज्याचा विरोधी पक्षनेताच हा फुटला आणि सत्तेत सामिल झाला. यावरून विरोधी पक्ष आहे की नाही असा सवालच आता जनता विचारत आहे. तर असाच सवाल माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सोलापूरमधील बार्शीमध्ये सभेत विचारला होता.

मुंबई | 16 जुलै 2013 : सध्या राज्यातील राजकारण हे कोणत्या दिशेने जात आहे. हे कोणालाच कळत नाही. राज्याचा विरोधी पक्षनेताच हा फुटला आणि सत्तेत सामिल झाला. यावरून विरोधी पक्ष आहे की नाही असा सवालच आता जनता विचारत आहे. तर असाच सवाल माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सोलापूरमधील बार्शीमध्ये सभेत विचारला होता. त्यांनी आपल्या राज्यात विरोधी पक्ष आहे की नाही असा सवाल केला होता. आता तर आता महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी सध्याच्या राजकारणावर संतप्त प्रतिक्रिया देताना, राज्यातील हे राजकराण कुठं जाईल याचा आपण साधा विचार तरी करतो का? महाराष्ट्रात सध्या संप्तप राजकारण सुरू आहे. तर सत्तेचं आणि स्वार्थाचं घाणेरडं राजकारण केलं जात असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे. ते मनसेकडून आयोजित मानवी साखळी एक संतापाची सही कार्यक्रमात सहभागी झाले असता बोलत होते. यावेळी तेथे काही नागरिकांनीही आपल्या व्यथा मांडलेल्या. यावेळी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांनी मुंबई फाळणीमध्ये मांडलेली व्यथा एका नागरिकांने पुन्हा मांडली. ही न्याय व्यवस्था केकानाची रखेल झाली ही संसद देखील हिजड्यांची हवेली झाली मी माझी व्यथा मांडू कोणाकडे कारण इथली न्यायव्यवस्था भ्रष्टतेने रंगीन झालेले आहे.

Published on: Jul 16, 2023 01:47 PM