‘अजित पवार गेलेच आणि शरद पवार गट देखील भाजपमध्ये जाईल’; राज ठाकरे यांचा मोठं वक्तव्य
तर विरोधी पक्ष नेता आणि विरोधी पक्षावरून देखी टोला लगावला आहे. काही दिवसांपुर्वीच अजित पवार यांनी विरोधी पक्ष नेते पद सोडून आपल्या गटासह शिंदे-फडणवीस युतीत गेले. ते राज्याचे उपमुख्यमंत्रीही झाले.
पुणे | 26 जुलै 2023 : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बंडखोरीवरून शरद पवार यांच्यावर पुन्हा एकदा तोफ डागली आहे. तर विरोधी पक्ष नेता आणि विरोधी पक्षावरून देखी टोला लगावला आहे. काही दिवसांपुर्वीच अजित पवार यांनी विरोधी पक्ष नेते पद सोडून आपल्या गटासह शिंदे-फडणवीस युतीत गेले. ते राज्याचे उपमुख्यमंत्रीही झाले. त्यावरून आता राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. तर अजित पवारांच्या शपथविधी होताच आपण एक ट्विट केल्याची आठवन करून देताना, पहिली टीम रवाना झाली असं म्हटलं होतं. आता सगळं तसंच होत आहे. तरव अजित पवार गटाच्या होर्डिंग्जवर शरद पवारांचे फोटो लागत आहेत. किती खोटं वागावं याला काही मर्यादा आहेत की नाहीत,” असं राज ठाकरेंनी टोला लगावला आहे. तर यात शरद पवार यांची मिलीभगत असल्याचा आरोप देखील राज ठाकरे यांनी केलाय.