‘अमित का टोलनाके फोडत सुटलेला नाहीय, पण भाजपने त्यांच्या घोषणेवर बोलावं’; राज ठाकरे यांचे भाजपला आव्हान

‘अमित का टोलनाके फोडत सुटलेला नाहीय, पण भाजपने त्यांच्या घोषणेवर बोलावं’; राज ठाकरे यांचे भाजपला आव्हान

| Updated on: Jul 26, 2023 | 6:53 PM

अमित ठाकरे यांची गाडी अडवल्यावरून समृद्धी महामार्गावरील सिन्नर टोलनाका फोडण्यात आला. त्यावरून भाजपकडून टीका करण्यात आली होती. तर त्या टीकेला मनसेकडून देखील प्रत्युत्तर देण्यात आलं होतं.

पुणे | 26 जुलै 2023 : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांच्यावरून सध्या जोरदार राजकारण तापलेलं आहे. अमित ठाकरे यांची गाडी अडवल्यावरून समृद्धी महामार्गावरील सिन्नर टोलनाका फोडण्यात आला. त्यावरून भाजपकडून टीका करण्यात आली होती. तर त्या टीकेला मनसेकडून देखील प्रत्युत्तर देण्यात आलं होतं. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मणिपूर मधील घटनेबद्दल थोबाड बंद ठेवणाऱ्या #भाजप महाराष्ट्रातील मुजोर टोल कंत्रादाराची दलाली करायची आहे का? असा सवाल केला होता. आता या प्रकरणावरून थेट राज ठाकरे यांनी अमित ठाकरे याची बाजू सांभाळत भाजपला टोला लगावत खोचक सवाल केले आहेत. यावेळी राज ठाकरे यांनी अमित ठाकरे हे राज्याच्या दौऱ्यावर असून ते काही टोल नाके फोडायला निघालेले नाहीत. तर ती अॅक्शनला रिअॅक्शनला आल्याचं म्हटलं आहे. तर यावेळी अमित ठाकरे यांच्यावर टीका करण्याआधी बोलण्यापेक्षा भाजपने आधी टोलमुक्त महाराष्ट्र करू या त्यांच्या घोषणेचं काय झालं त्यावर बोलावं असं म्हटलं आहे. तर त्यांनी यावेळी म्हैस्कर नावाच्या व्यक्तीचं नाव घेत त्यालाच कसे टोलची कंत्राटं मिळतात तो कुणाचा लाडका आहे? असा सवाल केला आहे. समृद्धी महामार्गावर आतापर्यंत अपघातात 400 लोकं मृत्यू झाला आहे. त्याची जबाबदारी भाजप किंवा सरकार घेणार का? असा सवाल देखील त्यांनी राज ठाकरे यांनी भाजपला केलाय.

Published on: Jul 26, 2023 01:22 PM